जिल्हयातील धर्मादाय रुग्णांलयावर " धर्मादाय रुग्णालय " असा फालक लावण्याची सक्ती करावी, लोकहित मंच अध्यक मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/04/2025 4:55 PM

सांगली प्रतिनिधी 
            पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचारा अभावी झालेल्या मृत्यू मुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे. या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यातील 430 धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात 29 रुग्णालय आहेत. या सर्व धर्मादाय रुग्णालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन होते का? हे पाहणे गरजेचे असल्याने लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन या सर्व रुग्णालयांवर "धर्मादाय रुग्णालय" असा फलक लावणे आवश्यक असल्याने  अशा रुग्णालयांना अशा तऱ्हेचा फलक लावणे बंधनकारक व सक्तीचे करावे आणि तसा आदेश काढण्यात यावा. अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे..
        शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणे बंधनकारक आणि आवश्यक आहेत त्या त्यांना दिल्या जातात का? याची तपासणी करणेही गरजेचे असल्याने. तशी तपासणी मोहीमही हाती घ्यावी अशीही मागणी दिसे यांनी केलीय.. जेणेकरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये. यावेळी गणेश थोरवे, अबबकर तहसीलदार आदी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या