फेसकॉम च्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना सवलती मिळवून देणार, अशोकराव होळकर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 09/04/2025 3:09 PM

फेसकॉम च्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना सवलती मिळवून देणार, अशोकराव होळकर            जेष्ठ नागरिकांना फेसकॉम च्या माध्यमातून शासकीय, सोयी सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून त्या मिळून देण्यास वचनबद्ध आहे असे प्रतिपादन फेसकॉम महाराष्ट्र अध्यक्ष मा. अशोकराव होळकर यांनी केले,                                भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने वर्धापन दिन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते, व्यासपीठावर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नामनिर्देशीत सदस्य, सचिनभाऊ ठाकरे, सार्वजनिक वाचनालय नाशिक अध्यक्ष संजय करंजकर, प्रा, सोमनाथ मुठाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय पिसें, श्रीराम कातकाडे, संस्थेचे अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड, माजी अध्यक्ष, दादासाहेब देशमुख, संपतराव काळे, पांडुरंग गायकवाड, पोपटराव हारक केशवराव पाळदे तानाजीराव गायधनी, आदी मान्यवर उपस्थित होते, प्रारंभी प्रतिमापूजन, व दिपप्रज्वलन संपन्न झाले, इतिवृत वाचन सचिव कचेश्वर मोरे, जमाखर्च खजिनदार किरण बेदरकर यांनी सादर केला. प्रसंगी संजय करंजकर, प्रा, सोमनाथ मुठाळ, सचिन भाऊ ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी शिवाजीराव घोरपडे, दिलीप चव्हाण, नारायण आडके, किरण बेदरकर, मारुतीराव कोरडे, देवराम मुठाळ, अंबादास पाटील, नरेंद्र जोशी, त्रंबकराव करंजकर, रमापती चौहान, बबनराव आडके, रतन लोट आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार प्रशांत कापसे यांनी मानले

Share

Other News

ताज्या बातम्या