महाराष्ट्र ग्रामीण बँक भगूर शाखेकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास पर्यावरण पूरक भेट

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 09/04/2025 2:34 PM

महाराष्ट्र ग्रामीण बँक भगूर शाखेकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास पर्यावरण पूरक भेट

  पर्यावरण संवर्धन व स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक भगूर शाखेने एक अनोखा उपक्रम राबवला. शाखा व्यवस्थापक सौं. उषा चव्हाण आणि रिजनल अधिकारी श्री. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास १२ झाडांच्या कुंड्यांची भेट देण्यात आली.
   स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे यांनी या भेटीचे स्वागत केले व स्मारक परिसर हरित करण्यासाठी बँकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
   हा उपक्रम स्मारक परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमात नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल, श्री एकनाथराव शेटे, बँकेचे कर्मचारी मंदार साखरे, भूषण तपासे, सुमित देशमुख यांसह स्मारक सहव्यवस्थापक आकाश नेहरे, खंडू रामगडे, समाजसेवक कैलास भोर, प्रशांत कापसे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
  स्मारक व्यवस्थापक भूषण कापसे यांनी बँकेच्या या उपक्रमाचे आभार मानत असे म्हटले की, "स्वच्छता आणि हरित पर्यावरणासाठी बँकेकडून राबवले जाणारे उपक्रम स्थानिकांसाठी प्रेरणादायी आहेत."
   सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने मनोज कुवर, दिपक गायकवाड, सौरभ कुलकर्णी, संभाजी देशमुख, भाऊसाहेब ससाणे यांनी बँकेचे अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या