चित्रकला, व्हीडिओ निर्मिती व डिजिटल पोष्टर स्पर्धेत उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे भरीव यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/04/2025 1:03 PM


    सांगली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभाग,सांगली यांचवतीने *अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम* आणि सलाम फाउंडेशन,मुंबई,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सांगली,व सहायता सेवाभावी संस्था.यांच्या संयुक्त विद्यमाने  घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेमध्ये नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,संचलित *सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड.* मधील इयत्ता ७ वी.ची विध्यार्थिनी *कु.नंदिनी हेमंत चव्हाण* हिने लहान गटात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून यश संपादन केले.
   तसेच *जिल्हा स्तरीय चित्रफित निर्मिती* स्पर्धेअंतर्गत *अकूज इंग्लिश मिडियम स्कूल,कुपवाड* चा *तृतीय क्रमांक* , व *जिल्हा स्तरीय डिजिटल पोस्टर्स* स्पर्धेमध्ये *सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड* विद्यालयाने *तृतीय क्रमांक* मिळवून घवघवीत यश मिळवले.
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
    या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ सांगलीचे विद्यमान पालक मंत्री माननीय आम.*श्री चंद्रकांत (दादा)पाटील* यांच्या शुभ हस्ते पार पडला. बक्षिसांचे स्वरूप रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह व प्रमाण पत्र असे होते.
       या स्पर्धेत शाळेचे शिक्षक श्री. सुशांत पाटील सर व श्री.हेमंत मोहिते सर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.यशस्वी विद्यार्थिंनिचे व शिक्षकांचे विशेष कौतुक जिल्हा शिक्षण विभागाचे *मा.शिक्षणाधिकारी श्री.राजेसाहेब लोंढे, उपशिक्षणाधिकारी श्री.विशाल दशवंत साहेब व विस्ताराधिकारी शेंडगे मॅडम* यांनी केले.
    या स्पर्धे साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिरीष चिरमे सर व अकूज इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ.कांचन उपाध्ये मॅडम यांचे मागदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर उपाध्यक्ष श्री.सुरज उपाध्ये सर सचिव श्री.रितेश शेठ सर संचालिका. सौ. कांचन उपाध्ये  मॅडम यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनीचे व शिक्षकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...

Share

Other News

ताज्या बातम्या