सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्यांच्या कारणामुळे चर्चेत आले आहे.
श्री खिलारे यांनी मंगेशकर हॉस्पिटल साठी अगदी देणगी स्वरूपात सदर जागा दिली होती मात्र त्याच खिलारे यांना सदर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर दहा लाख रुपये बिल आकारण्यात आले होते.
त्याच पद्धतीने सध्या शक्तिपीठ महामार्ग हा रेटला जात आहे तो पण असाच प्रकार आहे अगदी कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यांच्याच कित्येक पिढ्यांकडून टोल रूपाने पैसे वसूल करायचे.
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल अथवा राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग असेल दोन्ही प्रकार सारखेच आहेत.
कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा नाही याचा सारासार विचार सरकार करत असेल का त्यांच्या लक्षात येत नसेल का?
का फक्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं व आपला स्वार्थ साधण्यासाठी योजना राबवायच्या...
सतीश साखळकर उमेश देशमुख,महेश खराडे, प्रवीण पाटील उमेश एडके पैलवान विष्णू पाटील यशवंत हरगुडे प्रभाकर तोडकर सुनील पवार
शक्तिपीठ बचाव कृती समिती सांगली जिल्हा