*महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळी पुरस्कार समारंभाचे आयोजन*
अकोला--पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय हक्कासाठी संघर्ष तथा अविरत उपक्रमशिलतेने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना स्थापनेनंतरच्या ४ वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय,विभागीय आणि जिल्हा पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्याच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.हा पुरस्कार समारंभ राज्यातील कोणत्याही तिर्थक्षेत्री किंवा निसर्गरम्य ठीकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न राहील.साऱ्या महाराष्ट्रभरात सततच्या नाविण्यपूर्ण आणि दर महिण्यातील सलग ४४ मासिक विचारमंथन मेळावे तथा ईतर भरपूर उपक्रमांनी शासकीय व प्रशासकीय पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रशंसक प्रतिक्रिया प्राप्त करणारी ही संघटना आहे.यामुळेच समाज आणि पत्रकारांवरील अन्यायासाठी सतत आघाडीवर असणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाने फक्त ४ वर्षातच नावलौकिकाने एक नवी ओळख प्राप्त केलेली आहे. अशी माहिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून मारुती देवकर यांनी दिली.
महाराष्ट्राबाहेर आणि चार राज्यात प्रवेश करणाऱ्या या संघटनेने आतापर्यंत पत्रकार व समाजिक उपक्रम,जागृती,संघटन,न्याय मागण्यांच्या संघर्षक लढ्याव्यतिरीक्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया,आरोग्य ,रक्तदान शिबीरे, स्वास्थ, मन:स्वास्थ, कायदेविषयक मार्गदर्शन, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व विभूतींच्या मानवी जीवन मुल्यांच्या प्रसाराचे व्यापक कार्य केलेले आहे.मानवताधर्माच्या गुरूमंत्राने भेदभावरहित वाटचाल करून सामाजिक गती वाढविण्यासाठी विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या इतरांनाही प्रोत्साहन उर्जेची नवसंजीवनी प्रदान करण्याचा संघटनेचा संकल्प हा सुध्दा एक अभिनव उपक्रम राहणार आहे.त्याचा हा शुभारंभ कार्यक्रम राहणार आहे.त्यासाठी पत्रकारिता,सर्व मिडीया क्षेत्र, आणि साहित्य,प्रबोधन,जागृती,शैक्षणिक,कला,क्रिडा,
सांस्कृतिक,संगीत,लोककला, कृषी, विज्ञान, समाजसेवा,आपत्कालिन मदती व मार्गदर्शन, वंचित,निराधार,अपंग व रूग्ण सहकार्य सेवाव्रती,उत्कृष्ठ वक्ते,सहकार,वैद्यकीय सेवा,आणि ईतर विविध क्षेत्रात आपल्या नेत्रदिपक सेवाकार्याने अग्रेसर ठरलेल्या नामवंतांना लोकस्वातंत्र्य सेवा गौरव, जीवनगौरव, समाज रत्न गौरव,कला गौरव,असे राज्य,विभागीय व जिल्हा पातळीवरील विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क मारुती देवकर 9594424200
इच्छूकांनी आपल्या प्रस्तावाची फाईल
*श्री प्रदीप हरिभाऊ खाडे ,(ज्येष्ठ पत्रकार)*
*राष्ट्रीय उपाध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,*
*"पितृ छाया"खेडकर नगर अकोला ( विदर्भ)* *मोबा.क्र.९८२२२३००२५*
*४४४००१* *या पत्त्यावर दि.२० एप्रिल २०२५ पर्यंत* पोहचतील अशा पध्दतीने पाठवावेत. *अधिक माहितीसाठी मोबा.क्र.९४२२९३९९७९,९८५०२६८२६७,९८८१३०४५४६ *असे आवाहन संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रकाश पोहरे, सौ.अंजलीताई आंबेडकर, बाळकृष्ण आंबेकर,पुष्पराज गावंडे,राजेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,अंबादास तल्हार, मारुती देवकर व सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी,महाराष्ट्र व विभागीय पदाधिकाऱ्यांनी केले आहे.*
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या तत्वाधिष्ठीत व पारदर्शक सामाजिक सेवा वाटचालीसाठी आपलेही आर्थिक सेवा योगदान लाभावे यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क ठेवण्यात येणार आहे.पुरस्कारासाठी निवड समितीचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक राहील.तरी विविध क्षेत्रातील पात्र पुरस्कारार्थींनी आपल्या कार्याचे यथोचित मुल्यमापण करता यावे यासाठी आपल्या कार्याची छायाचित्रे आणि प्रकाशित वृत्तपत्र कटींगसह आणि पोस्टल पिनकोडसह पत्ता,मोबाईल क्रमांक व ई मेलसह संपूर्ण माहितीच्या परिचयपत्रासह आपले प्रस्ताव या पुरस्कारासाठी निवड होण्यास पाठवावेत.सोबत आपली ४ पासपोर्ट फोटो व आधार कार्डाची झेरॉक्स प्रत पाठवावी. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्माननिय पुरस्कारार्थींना निवड व निमंत्रण पत्रासह समारंभाच्या ८ दिवस अगोदर कुरिअर/ पोस्ट / ई मेल ) व्हाटस् अॕप या माध्यमातून कळविण्यात येईल. अशी माहिती मारुती देवकर यांनी दिली.