***महावीर जन्म कल्याणकानिमित्त समारंभ...
कुपवाड, ता. 8 : येथील 108 सुधर्मसागर मुनी महाराज प्रतिष्ठान आणि वीर सेवा दल कुपवाड शाखा यांच्यातर्फे भगवान महावीर यांच्या २६२४ जन्मकल्याणकानिमित्त उद्या (ता. 9) वीराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या (ता. ९) सायंकाळी सातला १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन लाल मंदिर, कुपवाड येथे कार्यक्रम होईल.
वीराचार्य पुरस्काराने तिघांना गौरविण्यात येणार आहे. लक्ष्मीबाई रायगोंडा पाटील यांना उत्तम श्राविका, अभयकुमार राजगोंडा पाटील यांना युवा उद्योजक, तसेच संतोष भालचंद्र कर्नाळे यांना उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी न समजलेले आई-बाबा' यावर प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे.
या सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, कुपवाडचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांवेळी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन सुधर्मसागर मुनी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.