मनपाची कर भरणा यंत्रणा ठप्प, आयुक्तांनी लक्ष घालावे : मनोज भिसे अध्यक्ष लोकह लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/04/2025 11:11 AM

*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी ऑनलाइन भरणा करण्याची सिस्टीम गेल्या आठवड्याभरापासून बंद पडली आहे. त्यामुळे* *महानगरपालिकेत कर भरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सदर सिस्टीम बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय. शिवाय गेल्या सात दिवसांपासून ही सिस्टीम बंद असून देखील याकडे जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांना ही सिस्टीम बंद पडल्याची कल्पनाही नाही*.
      *सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कामाबाबत गांभीर्यच उरलेले नाही हे यावरून दिसून येते. शिवाय कोणत्याही कार्यालयाला ही सिस्टीम बंद पडल्याची साधी सूचनाही मिळालेली नाही. महापालिका प्रशासनाच्या या दुर्लक्षितपणाचा नाहक त्रास सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सोसावा लागत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे*
       *नव्यानेच सांगली महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या रविकांत अडसूळ यांनी याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय लवकरात लवकर टाळावी. अन्यथा लोकहित मंचच्या वतीने  सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल*

*मनोज भिसे- अध्यक्ष, लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या