भगुरला मनसे तर्फे आई-वडिलांना विसरू नका; त्यांचा आदर करा या विषयावर- प्रा.वसंत हंकारे यांचे जाहीर व्याख्यान झाले रामजन्माष्टमी निमित्ताने रविवारी मनसे तर्फे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मनसे प्रदेश सरचिटणीस श्री. दिनकर आण्णा पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुश पवार, तालुका अध्यक्ष नितिन काळे, आयोजक मनसे भगूर अध्यक्ष सुमित चव्हाण मनसे भगूर उपाध्यक्ष शाम देशमुख रिटायर पोलीस अधिकारी रमेश पवार साहेब, विशाल बलकवडे, खंडेराव मेढे, दीपक बलकवडे, कैलास भोर, विक्रम सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आई-वडिलांची काळजी घ्या. त्यांचा आदर करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २०वर्षे मुलींचा सांभाळ केलं त्या मुली दोन दिवसाच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्य जनसाधारण असते, अनाथांकडून जाणून घ्या, असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांनी केले.
ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या राम जन्मोत्सवानिमित्त 'दमलेल्या आई बाप' या विषयावर भगूर येथे व्याख्यानात बोलत होते.. वसंत हंकारे यांनी सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाईलचा दुरुपयोग कसा टाळावा यासंदर्भात प्रबोधन केले. यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भाऊक झाले.१४ वर्षाची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोळखी व्यक्ती सोबत जाते तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल? तुमचं १४ वर्षाचं वय हे विवाह करण्याच आहे काय? नंतर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही असे म्हणते, असे म्हणत प्रा. वसंत हंकारे यांनी भगूर येथील मनसेने आयोजित केलेल्या राम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमात दमलेल्या आई बाप या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे शहराध्यक्ष श्री. सुमित चव्हाण व मनसे उप शहराध्यक्ष श्री. शाम देशमुख यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन आंधळे, अभिषेक चव्हाण, स्वप्नील देशमुख,मयुर चव्हाण, यश राजपूत,विकास मोरे,संतोष सोनवणे, हर्षल चव्हाण, यश देशमुख, पवन चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.