सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम, स्वच्छता अभियान राबवताना दिसत आहे त्याचे कौतुक आहे
मात्र त्याचबरोबर मनपा क्षेत्राचे खोक्यांचे शहर म्हणून जो डंका वाजत आहे याला जबाबदार कोण...
याबाबत मनपा मालमत्ता विभाग अतिक्रमण निर्मूलन विभाग नेमकं काय काम करत असतो
त्याच्या डोळ्यात देखत बेकायदेशीर खोकी उभारली जात आहे.
याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे
तसेच गेल्या कित्येक वर्षापासून नवीन खोक्यांचे लायसन बंद असताना सुद्धा नवीन खोक्यांची लायसन कुठनं आभाळातून पडत आहेत का...
का कुंपणच शेता खात आहे..
माननीय आयुक्त साहेब याबाबत काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा कळले पाहिजे
आणि मनपा क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी खोकी पुनर्वसन झालेला आहे अथवा ज्या ठिकाणी पुनर्वसन झालेली नाही मात्र खोके आहे अशा सर्वांचा सर्वे करून मूळ मालक जर त्या ठिकाणी व्यवसाय करत नसतील आणि त्यांनी जर ते भाड्याने दिले असेल तर गरजवंत व्यवसायिकांना सदर खोके देण्यात यावे याबाबत घरपट्टीच्या प्रमाणेच व्यापक सर्वे करण्यात यावा.
जेणेकरून गरजवंताला व्यवसाय करता येईल
आणि मनपा क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यावरील व्हिडिओ शूटिंग करून ज्या ठिकाणी खोटे बसवण्यात येईल त्या ठिकाणच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच बेकायदेशीर खोकी बसवताना ज्या कोणाचे राजकीय दबाव असेल त्यांची नावे जाहीर करण्यात यावीत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा