*आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांच्यासहित महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली कृष्णा घाटाची स्वच्छता
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने आज कृष्णा नदीच्या काठावर विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बरोबरच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांनीही सहभाग घेतला होता. आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली. या संपूर्ण महिनेमध्ये एक टनाहून अधिक कचरा नदी काठावरून संकलित करण्यात आला. शासनाच्या शंभर दिवस आणि महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत ही स्वच्छता मोहीम संपन्न झाली.