काल दिनांक ४|४|२०२५ रोजी श्री दत्तात्रय रामचंद्र भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त सावली बेघर निवारा केंद्रा मध्ये भोसले परिवार कडून निवारा केंद्रातील नागरिकांना अन्नदान करून साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे नेते शहाजी रामचंद्र भोसले यांचे थोरले भाऊ व मा नगरसेवक अभिजीत दत्तात्रय भोसले यांचे वडील श्री दत्तात्रय रामचंद्र भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त सावली बेघर निवारा केंद्र मध्ये अन्नदान करून व केक कापून साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. बेघर निवारा केंद्रातील नागरिकांना श्री दत्तात्रय रामचंद्र भोसले, मा शहाजी रामचंद्र भोसले, माजी सौ. शकुंतला दत्तात्रय भोसले, नगरसेवक अभिजीत दत्तात्रय भोसले, चि. हर्षवर्धन सोमनाथ भोसले, चि. मल्हारराजे अभिजीत भोसले यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले यावेळी निवारा केंद्राचे प्रमुख श्री मुस्तफा मुखावर व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
भोसले परिवार नेहमीच प्रभागा पुरते काम न करता संपुर्ण जिल्हात कार्यरत असतात. कोरोना काळात वैयक्तिक कोरोना सेंटर (दवाखाना) चालू करून जवळपास ५०० कोरोना ग्रस्ताना औषधे उपचार करून चांगल्या पध्दतीचे उपचार करून बरे केले आहे. महापुराच्या काळात भोसले परिवार यांनी २००५, २०१९,२०२१ च्या महापुरात स्वत रात्र दिवस राबुन पुर ग्रस्तांची सेवा केली आहे.
गेली ३० ते ३५ वर्षे भोसले परिवार प्रभाग क्रमांक १८ व आसपासच्या उपनगरात समाज सेवेचे काम करत आहे. सामाजिक क्षेत्रात व राजकीय प्रचंड मोठे काम शहाजी भोसले व नगरसेवक अभिजीत भोसले या काका पुण्याच्या जोडीने भोसले परिवारच्या माध्यमातून फार मोठे व प्रचंड सामाजिक कार्य केले आहे.
आज अशाच पध्दतीने वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान करून सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे.
यावेळी निवारा केंद्राचे प्रमुख श्री मुस्तफाभाई व इतर सर्वजण उपस्थित होते.