प्रीपेड मीटर साठी सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केल्यानंतर वर वर राज्य सरकारने घोषणा केली प्रीपेड मीटर बसवणे अनिवार्य नाही व विधानसभेच्या निवडणुका पार पाडून घेतल्या
मात्र आता स्मार्ट मीटरच्या नावाखाली अदानीचा उत्पन्न वाढवण्यासाठी छुप्या पद्धतीने प्रीपेड मीटरची अवलाद स्मार्ट मीटर च्या नावाखाली खपवण्याचा धंदा जोरात सुरू आहे.
आमच्या नागरिक जागृती मंचेकडे आज खन भागातील काही अपार्टमेंट मध्ये ग्राहकांना न विचारता परस्पर स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार घडलेला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली असता स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही बसवत आहोत असे सांगितले जात आहे मात्र हा सगळा फसवण्याचा व भविष्यातील खाजगीकरणाचा व प्रीपेड मीटरचा घाट घातला जात आहे तो पण छुप्या पद्धतीने चालू आहे
याबाबत ताबडतोब सदर मीटर बसवणे बंद करून नागरिकांच्यावर होणारा अन्याय थांबवण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलन उभा करावी लागेल
याबाबत सांगली जिल्ह्यातील खासदार असतील सर्व पक्षीय आमदार असतील यांनी याबाबत विरोध करून आपापली भूमिका व्यक्त करावी अन्यथा यांच्या दारात सुद्धा बसून आंदोलन करावे लागेल.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.