आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
वरकुटे - मलवडी : ब्रिजिंग ब्रेन्स भोसरी ,पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे 300वी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे . व्हिडीओ निर्मितीची अंतिम दि. 10 एप्रिल 2025 असून, अंतिम निकाल 31 /मे / 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत.
1) *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक युगापूर्वी कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या संकल्पक,* *2) स्त्री सत्ता आणि अध्यात्म:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व,* *3) सीमांच्या पलीकडे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन,* *४) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सामाजिक न्याय व लोककल्याणाची दृष्टी - आजच्या युगातील तिचे महत्त्व*
हे मुख्य विषय असून यापैकी कोणत्याही एका विषयावर चार ते सहा मिनिटांपर्यंत आपल्या भाषणाचा व्हिडिओ सादर करू शकता या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 11000/- हजार रुपये ,व्दितीय क्रमांकास 7000/-हजार रुपये ,तृतीय क्रमांकास ,5000/-हजार रुपये तसेच 15 उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. सहभाग घेण्यार्या प्रत्येकाला सर्टिफिकेट दिले जाईल. स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हिडिओ निर्मिती करता येईल. *व्हिडीओ निर्मितीची अंतिम दिनांक 10/4 /2025* असून, अंतिम निकाल 31 /5/ 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढील लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा
Registration Link : https://forms.gle/aR9uoEWQMKFHnPGk6
अधिक माहितीसाठी
फेसबुकवर https://www.facebook.com/profile.php?id=61568457387012
अधिक माहितीसाठी *९२२६३५७४००* या व्हाट्सअप क्रमांकवर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे.