सांगली जिल्हा नागरिक मंचच्या प्रयत्नाने म्हैसूर- दरभंगा एकसप्रेसला सांगली रेल्वे स्टेशन थांबा मंजूर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/04/2025 12:31 PM

सांगली रेल्वे स्टेशन वरून पावापुरी राजगिरी नालंदा शिखर्जी सारख्या जैन व बौध तीर्थ स्थळ जाण्यासाठी सोयीस्कर रेल्वे गाडी सुरू*

सांगली स्टेशनवरून भरपूर प्रवाशांनी तिकिटे काढून प्रवास करावा - सतीश साखळकर

सांगली-पटना-दरभंगा प्रवास असा असेल
गाडी क्र 06211 मैसूर-सांगली-दरभंगा एक्सप्रेस

ही गाडी सांगली रेल्वे स्टेशन वरून बुधवारी दुपारी 1:20 वाजता सुटेल.

सांगलीतून सुटल्यानंतर पुणे, भुसावळ, इटारसी, नरसिंगपूर(पचमढी), जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चिओकी, मुगलसराय(पं दीनदयाल उपाध्याय),  दानापूर, पटना, बख्तीयारपूर(नालंदा), बरौनी, समस्तीपुर इत्यादी स्टेशनवर थांबून दरभंगा येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोहोचेल.

ज्या प्रवाशांना पचमढी हिल स्टेशन व पचमढीतील गुप्त महादेव तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायचे असेल त्यांनी सांगली ते जबलपूर किंवा सांगली ते नरसिंगपूर तिकीट काढावे.

ज्या प्रवाशांना जैन व बौध तीर्थस्थळ पावापुरी, राजगिरी, क्षत्रियकुंड, नालंदा ईत्यादी जायचे असेल त्यांनी सांगली ते बख्तीयारपूर तिकीट काढावे. बख्तीयारपुर ईथून पावापुरी, राजगिरी फक्त 50 किलोमीटर आहे. 

ज्यांना शिखरजी तीर्थस्थळ जायचे आहे त्यांनी सांगली ते समस्तीपूर तिकीट घ्यावे. समस्तीपूरहून शिखरजी तिर्थ 270 किलोमिटर आहे.

तिकीट काढण्याआधी एजंटला सांगा बोर्डीग स्टेशन सांगली टाकावे.

*ग्रुप तिकीट बुकींग करणार्या प्रवाशांसाठी महत्वाच माहीती
*
*सांगली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी पुरेसा वेळ थांबणार*

जर आपले ग्रुप बुकींग असेल तर सांगली स्टेशनच्या अधिकार्यांना कळवा. आपल्या ग्रुपमधील सर्व प्रवाशी गाडीत चढल्यानंतरच रेल्वे गाडी सुरु होईल. 

9, 16, 23, 30 एप्रिल व 7, 14, 21, 28 मे तिकीटे उपलब्ध आहेत

आत्ताच या रेल्वे गाडीचे तिकीट काढावे.  ही गाडी लवकर हाऊसफुल होते. नंतर तिकीट मिळणार नाही.

Share

Other News

ताज्या बातम्या