सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विकास आराखडा अशा वेळेला मंजूर झालेला आहे आता दुसरा विकास आराखडा तयार करण्याची वेळ आलेली आहे
राज्यात सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो त्यांना फक्त खोट्यावलगणा करून तुंबड्या भरायचे असतात.
त्यांना शहरांच्या विकासाचे काही देणे घेणे असते असे वाटत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे सामिकू मनपा विकास आराखड्याची मंजुरी दिसून येते.
आता जो अंतिम विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्यातील आरक्षणाचा व डी पी रोड चां बाजार काय काय झालेला आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे व्हायला नको
मग कोणत्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांचे समर्थक कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा विकास आराखडा आणि शहराच्या उज्वल भवितव्यासाठी काही करणे गरजेचे आहे असे वाटत नाही.
आम्ही लवकरच या सगळ्या गोष्टीचा आणि शहानिशा करून भांडाफोड करणार आहोत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा