आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
म्हसवड दि:माण तालुक्यातील म्हसवड येथील एका व्यक्तीची 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्याची एकावर म्हसवड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी रा.म्हसवड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.तर आहे. तर राजू ऊर्फ राजाराम पवार रा. म्हसवड असे तक्रारदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी दि. 26 ऑक्टोबर 2015 ते दि. 27 फेब्रुवार 2025 रोजी म्हसवड ता.माण जि.सातारा येथील सल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी याने म्हसवड येथील सिटी सर्व्हे नंबर 396/4 मध्ये विक्री केलेला 03 प्लॅट न देता तक्रारदाकडून 22 लाख रुपये घेवुन बांधकाम पुर्ण न करता ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे न वागता खोटी कागदपत्रे दाखवुन तक्रारदार महार जातीचा असलेचे माहीत असुन देखील फसवणुक केली आहे व सदरच्या फसवणुक केलेल्या रक्कमे बाबत व प्लॅट बाबत विचारणा करण्या करिता गेले असता त्याने "महारांना प्लॅट देत नाही मी , तुमची लायकी आहे का प्लॅट घेण्याची" असे बोलुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची सल्लाउद्दीन काझी याचे विरुध्द म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे करित आहेत.