५७ व्या सिनियर राष्टीय खो-खो स्पर्धेत कुपवाड राणापताप मंडळाची खेळाडू प्रगती कर्नाळे हिने पटकावले सुवर्णपदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/04/2025 7:29 PM

पुरी ओडीसा येथे झालेल्या 57 व्या सिनियर राष्ट्रीय खो स्पर्धेत कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाची खेळाडू कु. प्रगती संतोष कर्नाळे हिने सुवर्णपदक मिळवले.तर पुरुष गटात मंडळाचा अक्षय आनंदा मासाळ याने रौप्यपदक मिळवले.

 अंतिम सामन्यात यजमान ओडिसा संघावरती रोमहर्षक विजयी मिळवित महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्ण पदक मिळवले मंडळाची कु.प्रगतीची हि दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. या पुर्वी 14 वर्षा खालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना सुवर्ण पदक मिळवले होते. 
      मंडळाचा अक्षय मासाळ याची सलग 3 री सिनियर राष्ट्रीय स्पर्धा होती. मागील स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक होते. या वेळी मात्र बलाढ्य भारतीय रेल्वे संघाबरोबर अंतिम सामन्यात खेळताना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले 
मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील, रमेश पाटील, संतोष कर्नाळे,विजय पाडळे, महेंद्र पाटील, संजय हिरेकुर्ब, विशाल बन्ने,महेश कर्नाळे. शिवसागर पाटील, राहुल गवळी, प्रा.सचिन चव्हाण, प्रा.विजय पाटील, वासुदेव जमदाडे,अनिल पाटील, अतुल पाटील, शितल कर्नाळे. अभिजित सुतार. आदिचे मार्गदर्शन मिळाले.

Share

Other News

ताज्या बातम्या