प्रति
मा आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय :- मनपा क्षेत्रातील खुले गटारीचे व ड्रेनेजचे चेंबर बंद करणे बाबत
महोदय
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बऱ्याच ठिकाणी गटारीचे व ड्रेनेजचे चेंबर यांच्यावरील लोखंडी जाळ्या असतील अथवा सिमेंटचे झाकण असेल हे बऱ्याच ठिकाणचे मोडकळीस आलेले आहे अथवा निघून गेलेले आहे
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत अथवा घडू शकत आहेत
याबाबत तातडीने सदर चेंबर बंदिस्त करून होणारे अपघात टाळण्यात यावे अशी विनंती आहे
तसेच सदर चेंबर मोजण्यासाठी वेगवेगळ्या टेंडर काढून काम न करता दिले काढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी व संबंधितांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
राणी सरस्वती शाळेसमोर सांगली शहर पोलीस निरीक्षक यांच्या बंद पडलेल्या बंगल्या शेजारी परिस्थिती दिसत आहे..
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा