क्राँक्रीट रोडचे राहिलेले अर्धवट काम पूर्ण करा, कुपवाड शहर व्यापारी संघटनेची आयुक्ताकडे मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/04/2025 7:32 PM

सध्या कुपवाड मध्ये अर्धवट स्थितीत असलेल्या काँक्रीट रोडचे राहिलेले काम पूर्ण करून त्या रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून पार्किंग संदर्भात पट्टे मारणे व इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी व्यापारी संघटनेतर्फे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली यावेळी लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून इतर अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी व्यापारी संघटनेला दिले 
यावेळी
आयुक्त पदी नियुक्ती झाली बद्दल मा आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांचा कुपवाड शहर व्यापारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे उपाध्यक्ष सचिन नरदेकर अमर डिडवळ अनिल कवठेकर स्वच्छता दूत राकेश  दड्डणानावर लक्ष्मण पाटील  निलेश चौगुले श्याम भाट अभिजीत कोल्हापूरे राजू खोत रमेश भानुशाली आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या