सांगली दि ३०,
माझी कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आचारसंहिते पूर्वी दोन दिवस अगोदर बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा होईल अशी घोषणा केली होती त्यामुळे गोरगरीब कष्टकरी मोलमजूर करणारे बांधकाम कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु दिवाळी सुरू होऊनही कामगारांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा झाले नाहीत अशा फसव्या घोषणेमुळे कर्मचारी यांचा अपेक्षाभंग झालेला आहे. वास्तविक महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे कोट्यावधी रुपयाच्या ठेव पावत्या आहेत व त्याच्या व्याजातूनच बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जाते त्यामुळे कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ देण्याकरता शासनाकडे पाठपुरावा करण्याची कोणतीही आवश्यकता मंडळाला भासत नाही. सदर मंडळाचे अध्यक्ष हे कामगार मंत्री असतात गतवेळचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा केली होती तीही फसवी ठरली व सध्याचे माजी कामगार मंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी सुरेश खाडे यांनी निवडणूक आजच्या संहिता लागण्यापूर्वी बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी जमा केले जाईल असे फसवी घोषणा करून कामगारांचा अपेक्षा भंग केलेला आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगार हे नाराज असून आम्ही अशा उमेदवारांना का मतदान करावे?असा सवाल त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. एडवोकेट सध्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन त्या माध्यमातून वारंवार बांधकाम कामगार व इतर सर्व कामगार यांच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलने निदर्शने केली गेली परंतु महाराष्ट्र शासनाने व बांधकाम मंडळाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अशा फसव्या घोषणा करून बांधकाम कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारला परत सत्तेत येऊ द्यायचे का तसेच अशा फसव्या कामगार मंत्र्याला पुन्हा मतदान करावे का? असा सवाल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी केला आहे.