गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात प्रशासनाचा अनोखा उपक्रम

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 01/07/2020 11:10 PM

कोरची - आशिष अग्रवाल आज १ जुलै राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित महाराष्ट्राचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन. आजचा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'कृषी दिन' म्हणून साजरा होतो. गेली काही वर्षे राज्यात याच दिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवडीच्या महा अभियानाचा प्रारंभ केला जात होता. हेच निमित्त साधत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यात प्रशासनाने एक अनोखा उपक्रम राबविला. कोरची तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी व सामान्य नागरिक यांनी एकत्र येत 52 हजार सीताफळ बियांची लागवड केली. कोरची तालुका घनदाट जंगलाचा भाग आहे. याभागातील जांभूळ फळ फार प्रसिद्ध आहे. यापुढच्या काळात कोरची तालुक्यात सीताफळाचे उत्पन्न वाढावे यासाठी येथल्या गटविकास अधिकाऱ्यांनी हा कल्पक उपक्रम राबविला आहे. सिताफळाचे झाड कुठलाही प्राणी खात नाही. याचाच फायदा घेत स्थानिक बचत गट आणि ग्रामपंचायतींना उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी 52 हजार सीताफळ बियांची लागवड कोरची ते कुरखेडा या तीन किलोमीटरच्या परिघात करण्यात आली. या उपक्रमाला कोरची तालुक्यातील नागरिक व प्रशासकीय अधिकारी -कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. आगामी काळात सीताफळाच्या लागवडीने या भागात उद्यमशीलता वाढीस लागावी असा यामागील उद्देश आहे. यातील निम्मी झाडे जरी जगली आणि फळे देऊ लागली तरी या अभियानाचे उद्दिष्ट सफल होणार आहे. कोरची तालुक्यातील या उपक्रमाने मात्र राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमाला श्रावण मातलाम सभापती पं स कोरची, डी.एम. देवरे गटविकास अधिकारी, सौ. सुशिलाताई जमकातन उपसभापती, सौ. कचरीबाई काटेंगे सदस्य, सदाराम नरोटे सदस्य, एस. आर. टिचकुले सहाय्यक गटविकास अधिकारी, राजेश फाये विस्तार अधिकारी, विनोद पांचाळ कृषी विस्तार अधिकारी, बाबर कृषी विस्तार अधिकारी, पवार विस्तार अधिकारी, कोपुलवार विस्तार अधिकारी, आशिष भोयर शाखा अभियंता, दामोदर पटले सचिव ग्रा. पं. कोचीनारा, लांजेवार तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी, ग्रामपंचायत केंद्राचा केंद्रचालक, संपूर्ण ग्रामपंचायत परिचर, रोजगार सेवक, पाणीपुरवठा कर्मचारी, महिला बचत गट तसेच गावकरी नियमांचे पालन करुन उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या