भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2025 या नववर्ष कॅलेंडरचे वणी येथे प्रकाशन सोहळा संपन्न
वणी-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्यपक्षाने नववर्षाचे कॅलेंडर काढले आहे.या कॅलेंडरचे राज्यातील सर्व जिल्ह्या जिल्ह्यात प्रकाशन सोहळे झालेत.याच अनुषंगाने काल नववर्षाच्या पुर्वसंध्येला जि.प.काॅलनी येथील कार्यालयात पक्षाच्या नववर्ष कॅलेंडरचे जेष्ठ नेते काॅ.प्रा.धनंजय आंबटकर यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हासचिव अनिल घाटे,राज्य कौंसिल सदस्य सुनिल गेडाम व अ.भा.दलीत अधिकार आंदोलनचे वणी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते.हे कॅलेंडर जिल्ह्यातील सर्व सभासदांना वितरित केल्या जाणार आहेत.या कॅलेंडरची सहयोग राशी 50 रु.ठेवण्यात आली आहे.ईतरांना हवी असल्यास बुकींग करावे व कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावे.कार्यक्रमाचे संचालन अथर्व निवडिंग यांनी तर आभार मारोती काळे यांनी मानले.