नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटूंबासाठी मकर संक्राती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिध्द वस्तुंचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड याठिकाणी होणार असून या प्रदर्शनाबरोबर महाराष्ट्रातील विविध प्रसिध्द खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे. तरी या जिल्ह्यातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नांदेड यांनी केले आहे. या सरस विक्री प्रदर्शनामध्ये महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या कुटूंबासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व राज्यातील व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन व चायनीज प्रसिध्द खाद्य पदार्थाची मेजवाणी मिळणार आहे. यामध्ये नायगाव तालुक्याची घोंगडी, कंधारची बिबा गोंडबी व बिबा तेल, अर्धापूरची केळी चिप्स व हळद, माहूरचे बंजारा ड्रेस, नांदेडचा सोया पनीर, कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची शेंगदाना चटणी, बाजरीची कडक भाकरी, धर्माबादची लाल मिरची, लोह्याची बाजरीची खारोडी, हदगावचे व्हेज ऑम्लेट, अमरावतीची मांड्यावरची मडक्यावर केलेली पुरण-पोळी, बाजरीची भाकरी व बेसन आणि ठेचा, पुरुषांचे ड्रेस, साड्या, लहान लेकरांची खेळणी, शोभेच्या वस्तु, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, गंगाखेडची प्रसिध्द कलम, किनवटची धावंडा डिंक, चारोळी आणि मध, भोकरची आवळा कॅन्डी, सौदय प्रसाधने, बेन्टेक्स ज्वेलरी, नागपूरची संत्रा बर्फी, कोकणातील काजू व मँगो पल्प, रुचकर पापड, कुरडई, अहिल्यानगरचा चांदवडचा प्रसिध्द पेढा, विविध प्रकारचे लोणचे, गावरान झनझनीत मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, सर्व प्रकारच्या जात्यावर केलेल्या डाळी , गावरान तूप, मुखेडचे सेंद्रीय लाकडी घाण्यावरचे करडई तेल, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, नाशिकच्या मणुका, सावंतवाडीच्या लाकडी वस्तू, वाणाचे वस्तू, भांडी इत्यादी वस्तूंची विक्री होणार आहे.तसेच या प्रदर्शनात दररोज संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणीचे आयोजन केले आहे. तरी नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांनी केले आहे.