लोकहित मंचच्या वतीने सलग अठराव्या वर्षी "दारू नको, दूध प्या " उपक्रम, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/12/2024 8:45 PM

सांगली प्रतिनिधी 
         31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सांगलीतील राम मंदिर चौकात लोकहित मंचच्या  वतीने सलग अठराव्या वर्षी दारू नको दूध प्या हा अभिनव उपक्रम राबवला गेला.
         अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम, भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवण्याचे काम करत सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात जाऊन लढणारी संघटना म्हणून लोकहित मंचकडे पाहिले जाते
           या लोकहित मंचचा एक अभिनव उपक्रम  म्हणजे " दारू नको, दूध प्या" दरवर्षी 31 डिसेंबर रोजी तरुण पिढी ही दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करत असते. याला आळा बसावा आणि  तरुणांच्या मनात आरोग्या विषयी जाणीव निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकहित मंचच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे व त्यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते "दारू नको, दूध प्या"हा उपक्रम राबवतात. या वर्षी सदर  उपक्रमाला समस्त सांगलीकरांच्या प्रतिसादाने तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली.
    यावेळी पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील,सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबालाल जमादार तसेच लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले.
      यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे व नवाज शेख, सिद्धार्थ खंडागळे, राजू जाधव,शितल थोरवे रोहित आरगे अरविंद कांबळे, युसुफ बारगीर, मिलिंद कांबळे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या