*कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस तोट्यात - वार्षिक रुपये 4 कोटी नुकसान होत आहे*
*प्रत्येक वर्षी 70 हजार पेक्षा अधिक एसी व स्लीपर तिकिटे रिकामी असतात*
*रिकामी गाडी पळवण्यापेक्षा कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस गाडी सांगली मार्गे नेल्यास वार्षिक तीन कोटी अतिरिक्त उत्पन्न मिळेल व गाडी फायद्यामध्ये येईल*
*सांगली रेल्वे स्टेशन वरून वार्षिक दीड लाख प्रवासी या गाडीने प्रवास करतील व रेल्वेला अतिरिक्त उत्पन्न मिळेल*
कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वे गाडी क्रमांक 22156 मध्ये रोज एसी स्लीपरची 100 पेक्षा जास्त तिकिटे रिकामी असतात
कलबुर्गी-सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस गाडी क्रमांक 22155 मध्ये रोज सरासरी 100 तिकीट रिकामी असतात.
एकूण कोल्हापूर ते कलबुर्गी व कलबुर्गी ते कोल्हापूर दरम्यान रोज 200 तिकीट रिकामी असतात.
मिरज ते सोलापूर तिकीट किंमत रुपये 555 गृहीत धरून रोज रुपये 1.11 लाखाचे नुकसान रेल्वेला होत आहे. वार्षिक नुकसान रू 4 कोटी पेक्षा जास्त आहे.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या व सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या जवळपास सर्व गाड्यांना प्रतिफिरी 80 हजार ते एक लाख उत्पन्न मिळत आहे.
हेच उत्पन्न गृहीत धरले तर सांगली रेल्वे स्टेशन वरून कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी व कलबुर्गी-सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सांगली मार्गे धावल्यास एकूण वार्षिक 3 कोटीचे उत्पन्न मिळेल
दररोज येऊन जाऊन सांगली रेल्वे स्टेशन वरून 200 आरक्षित तिकिटे विक्री होतील व दोनशे अनारक्षित जनरल तिकीट विक्री होतील एकूण 400 प्रवासी रोज सांगली रेल्वे स्टेशन वरून या गाडीत ये जा करतील.
वार्षिक जवळपास 1.46 लाख प्रवासी या गाडीत सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करतील.
याबाबतीत सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष श्री सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरमवीर मिणा, सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे मॅनेजर तसेच पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे मॅनेजर यांना पत्र लिहून कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी गाडी दोन्ही दिशेने सांगली मार्गे आणावी असे पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे ही गाडी सांगली मार्गे येणे सहज शक्य असल्याने येत्या 8 दिवसात ही गाडी सांगली मार्गे सुरु करावी अन्यथा सांगली रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचने दिले आहे.
वर्षानुवर्षी सांगली शहरातून सोलापूर जाणारी रेल्वे गाडी नाही याबाबत अनेक पत्रव्यवहार करून तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून देखील जर सोलापूर जाणारी गाडी सांगली स्टेशनवरून मिळत नसेल तर नाईलाज आंदोलन करावे लागेल असे श्री सतीश साखळकर यांनी सांगितले.
याबाबत श्री सतीश साखळकर हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व खासदार यांना भेटून देखील ही मागणी करणार आहेत.