अनाकलनीय सिबील संकल्पनेचा एम. एस. एम. ई. उध्योजकांना नाहक त्रास: सतिशा मालू

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/01/2025 2:19 PM

कृष्णा व्हॅली चेंबरचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना निवेदन 
 
कुपवाड : प्रतिनिधी 

सर्वसामान्य उद्योजक हा वित्तीय संस्थेकडून होणाऱ्या वित्त पुरवठ्यावर अवलंबून असतो. तो एकाच वेळी कर्ज घेऊन उद्योग उभारणी करत नसतो. जस-जशी गरज लागते त्या वेळी उद्योजकांस कर्ज उभारणी करावी लागते. कर्जदारास/उद्योजकास  कर्ज घेते वेळी सिबील बाबत विनाकारण अडचणीना सामोरे जावे लागत आहे तरी त्यामध्ये बदल करण्यात यावे याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना निवेदन  दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक हरिभाऊ गुरव यांनी दिली.

निवेदनात सिबील संकल्पनेत बदल करणेबाबत असे म्हंटले आहे की, सिबील ठरवण्याचे सूत्रामध्ये पारदर्शीपणा हवा म्हणजेच एकच निश्चित सूत्र असावे. ज्या खाजगी वित्तीय संस्था आहेत त्यांच्या नोंदी आर.बी.आय. मान्य संस्थेकडून मंजूर करूनच नोंदवाव्यात म्हणजे फसवणुकीच्या नोंदी होणार नाहीत म्हणजेच खाजगी वित्तीय संस्थांना परस्पर नोंदी करणेस बंदी घालावी. सिबील ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वीच्या सर्व नोंदी रद्द करण्यात याव्यात. कर्ज निरंक केल्यानंतर ज्या बँका विशिष्ट वेळेत नोंद करत नाहीत त्यांच्यावर कठोर दंड आकारावा. चुकीच्या सिबील नोंदी संदर्भात तक्रार करणेस व न्याय कायदेशीर मार्गाने दाद मागणेसाठी सुविधा उपलब्ध करावी म्हणजे वित्तीय संस्थांचा एकछत्री कारभार चालणार नाही. 

तरी लवकरात लवकर सिबील संकल्पनेत बदल करून एम.एस.एम. ई. उद्योजकांना जो विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे त्यातून मुक्त करावे.

Share

Other News

ताज्या बातम्या