लक्ष्मीनगर कुपवाड येथील १५ झाडे " धोकादायक" वरून तोडली, मात्र जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/01/2025 5:46 PM

   लक्ष्मीनगर ( कुपवाड ) येथील महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी, गणपती मंदिर ओपन स्पेस मधील ४० वर्षांपूर्वीची सुमारे १५ झाडे अर्धवट तोडण्यात आले आहेत. सोसायटीच्या अवसायकांच्या मागणीवरून ही झाडे तोडली असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांनी दिली. 
      लक्ष्मी मंदिरच्या बाजूला संस्थेच्या ओपन स्पेस मध्ये सुमारे ४० वर्षे पूर्वीचे जुने गणपती मंदिर आहे. या ओपन स्पेसच्या तिन्ही बाजूला सुमारे ४० फूट उंचीचे निलगिरी व अशोक ची मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. या ओपन स्पेस मध्ये नवरात्र उत्सव व गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. परंतु जागेच्या कमतरतेमुळे नवरात्र उत्सव चौकातील मोकळ्या मोठ्या पटांगणात साजरा केला जातो. 
        अचानक काही लोक ट्रक व झाडे तोडायचे हत्यार घेऊन आली व त्यांनी सुमारे १५ झाडे अर्धवट तोडली. जमिनीपासून १५ ते २० फूट अंतराचा झाडाचा बुंधा ठेवून त्यावरील झाडे तोडली आहेत. अचानकपणे झाडे तोडली जात असल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता अवसायक यांच्या मागणीवरून महापालिकेने झाडे तोडली असल्याची माहिती समोर आली.
    ही झाडे तोडल्याने ओपन स्पेस ओसाड दिसू लागला आहे. खरोखरच ही झाडे धोकादायक होती का याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. ही झाडे वाळली नव्हती अथवा धोका निर्माण झाला नव्हता मग ही झाडे का हटवली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

     
    ****   झाडांची कत्तल बेकायदेशीरच....
 
तोडलेली झाडे ओली होती अजून वाळली नव्हती. ती झाडे बाजूच्या इमारतीपासून लांब होती. अवसायकाने झाडे तोडण्यासाठी सर्व सभासदांची वार्षिक सभेत न मंजूर घेतली नव्हती. झाडे तोडण्यापूर्वी ती तोडण्याबाबत महापालिकेने अथवा संस्थेने जाहीर निवेदन केले नव्हते. अचानक पणे तोडलेल्या  या झाडाचे पुढे काय केले ? हा सर्व प्रकार संशयास्पद असून अवसायाक व महापालिकेने एक प्रकारची झाडांची कत्तलच केली आहे. 

     मिलिंद साबळे 
  सामाजिक कार्यकर्ते

      वन विभागाच्या परवानगीने जागा मालकाने झाडे तोडावीत असा नियम आहे. परंतु अवसायक यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने झाडे तोडली आहेत. त्यामुळे ही वृक्षतोडच बेकायदेशीर असून दोषीवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महालक्ष्मी हाउसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीप आवटी यांनी दिला आहे.
    श्री महालक्ष्मी हाउसग सोसायटी (कुपवाड) यांच्या मालकीच्या ओपन स्पेस मधील सुमारे २२ मोठी झाडे अर्धवट तर २ झाडे जमिनीपासून तोडण्यात आले आहेत. दोन ट्रक भरून तोडलेली झाडांची लाकडे नेण्यात आले आहेत. याबाबत दिलीप आवटी व अन्य सभासदांनी विरोध केला असता झाडे तोडणाऱ्या माने नामक व्यक्तीने या सभासदांना अरेरावी केल्याचा आरोप आहे. 
    याप्रकरणी आवसायक अरुण सूर्यवंशी म्हणाले की सभासदांनी महापालिकेकडे झाडे तोडण्याबाबतचा अर्ज केला होता व महापालिकेने विचारल्यानंतर मी ती झाडे तोडण्यास मी ना हरकत दिली होती. ही झाडे खाजगी जागेत म्हणजेच संस्थेच्या ओपन स्पेस मध्ये असल्याने नियमाप्रमाणे संस्थेने सभासदांच्या मान्यतेने झाडे तोडणे आवश्यक होते. 
 अवसायक यांनी संस्थेने ती झाडे संस्थेने तोडली नसल्याचे खुलासा केल्याने याबाबत संशय वाढत चालला आहे. 
       कायद्याने वन विभागाचे काही अधिकार महापालिकेला बहाल झाला आहे. यामध्ये धोकादायक झाडे तोडण्याची परवानगी जागा मालकाला देण्याचा अधिकार महापालिकेला आहे. परंतु संस्थेच्या वतीने ती झाडे तोडली नसल्याचा खुलासा सूर्यवंशी यांनी केल्याने नेमकी झाडे तोडली कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
     याबाबत काही सभासदांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व संजयनगर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या