राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्याना नववर्षानिमित पत्र भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/01/2025 1:10 PM

प्रति, 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्य, 

आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! 

२०२४ हे वर्ष आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक ८ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच. 

आता दिन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची हि वेळ आहे. सह्याद्री सारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही. 

निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात ! छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये. 

निवडणुकीतील लाट हि केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात.  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.

पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! 

सदैव आपलाच, 
जयंत पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या