भामरागड तालुक्यात निकृष्ठ रस्ता बांधकाम. एका महिन्यातच उखडले डांबरीकरण. सखोल चौकशीची मागणी.

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 02/07/2020 7:10 AM

भामरागड - तालुक्यात यावर्षी ठिकठिकाणी रस्त्यांचे बांधकाम (दर्जोन्नती) करण्यास सुरुवात झाली.काही कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम व डांबरीकरण केल्यामुळे एका महिन्यातच डांबरीकरण उखडून खड्डे पडायला लागलेत.त्यामुळे शासनाचे करोडो रुपये खड्ड्यात गेलेत की,कोणाकोणाच्याॽ खिशात गेलेत यांची चर्चा रंगू लागली असून सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी ठिकठिकाणी रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे कामे निघाले.भामरागड तालुका भ्रष्टाचाराचे कुरण आहे यात मनसोक्त चरता येईल असे काही कंत्राटदार व अधिकारी यांना वाटल्याने एका कंत्राटदाराने न केलेल्या कामाचे लाखो रुपये लाटले.नुकतेच त्या कंत्राटदारावर व संबंधित दोन अभियंत्यांवर पोलीसात तक्रार करण्यात आली. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली.त्यामुळे आतातरी इतर कंत्राटदार "पुढच्यास ठेच,मागचा शहाणा"होईल असे वाटते होते.मात्र रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम पाहता त्यांचेवर काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामविकास मंत्रालय भारत सरकारच्या एका उपक्रमांद्वारे 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'अंतर्गत बोटनफुंडी-ताडगाव-मन्नेराजाराम-बामनपल्ली या 38 कि.मी. रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे(बांधकाम)काम एका कंत्राटदाराला देण्यात आले.याच कामात स्लॅब ड्रेन-42नग व नाली बांधकाम-1280मीटरचा समावेश आहे.17,49,05,263/-(अक्षरी रुपये सतरा कोटी,एकोणपन्नास लाख,पाच हजार, दोनशे त्रेसष्ठ)रुपयांच्या सदर कामाचा कार्यारंभ आदेश दिनांक 13/08/2019 असून कामाची मुदत 12/08/2020 पर्यंत आहे.तसेच पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची हमीसुद्धा आहे.कंत्राटदारांनी कामाचा फलक न लावताच कामाला सुरुवात केली.थातुरमातुर खोदकाम करुन गिट्टी भरली,त्यावर काही ठिकाणी मुरुम तर काही ठिकाणी माती टाकली.चक्क मातीवरच डांबरीकरण केले.तेसुध्दा अत्यल्प डांबर वापरून.केवळ 1 ते 2 इंचाचे हे डांबरीकरण एका महिन्यातच उखडले व माती दिसू लागली.डांबरीकरण सुरू असतांना काही ठिकाणी तीन दिवसांतच माती दिसू लागली, त्यामुळे जिंजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सिताराम मडावी यांनी सदर कामावर आक्षेप घेतला असता,उकडलेला डांबर परत खोदून निट करून देण्याचे आश्वासन दिले.मात्र आता तर पूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडून खड्डे पडू लागले व खड्ड्यात पाणी साचू लागले.पायी जाणारांचे पाय फसू लागले.दुचाकी व चारचाकी वाहनांचे चाक फसू लागले.हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे हे पाहताक्षणीच लक्षात येते. भामरागड तालुक्यात राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे.येथील बहुसंख्य आदिवासी बांधव व जनता भोळी, अशिक्षित आहे.त्यामुळे व्यापक समाजहित लक्षात घेऊन,निर्भिडपणे सदर कामाची सखोल चौकशी करावी.तसेच अभियंत्यांचे समक्ष पुनश्च रस्ता खोदून गिट्टी,मुरूम डांबराचे पुनर्भरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या