*स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 01/01/2025 8:05 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

*- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*

सातारा दि.  : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजु व गरीब रुग्ण येत असतात.    येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला  आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत.  याबाबतीत कोणत्याही तक्रारी येऊ देवू नका, असे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांनी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील  जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करावे, त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये, असे निर्देश देऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, रुग्णालय स्वच्छतेवरही भर द्यावा. रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय प्रतिपुर्ती प्रमाणीकरणासाठी येणारी देयके वेळेत प्रमाणित करुन द्यावी.
रुग्णालयात कामासाठी येणाऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका. त्‍यांची कामे तातडीने करा. समाजसेवक अधिक्षकांनी रुग्णांसाठी असणाऱ्या हक्कांची व सुविधांची माहिती देण्याबरोबर त्यांना स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर उपचार कसे मिळतील यासाठी काम करावेत. त्याचबरोबर रुग्णांना देण्यात येणारे जेवणाची तपासणी करुन जेवणात आणखीन रुग्णांना पोषक पदार्थ वाढवावेत, असे निर्देशही  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले

Share

Other News

ताज्या बातम्या