सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या प्रभाग समिती 3 कुपवाड तसेच प्रभाग समिती क्रमांक 4 मिरज येथे खाजगी कंपनीमार्फत घरपट्टीचा जो सर्वे करण्यात आलेला आहे त्या सर्वच्या अनुषंगाने सर्व घरपट्टी धारकांना नोटिसा बजावण्यात आलेले आहे
त्याबाबत संभ्रमावस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.
महानगरपालिकेने प्रत्येकाला नोटिसा देऊन खुलासा मागवलेला आहे.
पुढच्या टप्प्यात प्रभाग समिती क्रमांक 1, प्रभाग समिती क्रमांक 2 सांगली शहर व उपनगर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने नोटिसा निघणार आहेत
सदर घरपट्टीच्या नोटिसा बाबत मत मतांतरे संशय कल्लोळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे
खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या सर्वे मध्ये जर तफावत मोठ्या प्रमाणात असेल
तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाच्या पद्धती बाबत संशय निर्माण होताना दिसत आहे.
याला जबाबदार कोण..?
सदर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे,
असे बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत.
तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरपट्टी बसताना दिसत आहे त्याबाबत सुद्धा क्रीडाई असेल बिल्डर असोसिएशन असेल वेगवेगळ्या माध्यमातून याबाबत चर्चा विनिमय होत असतात
वरील सर्व निर्माण झालेल्या प्रश्नांच्या बाबत मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता कष्टकऱ्यांची दौलत येथे
सर्व माजी पदाधिकारी , माजी नगरसेवक, सामाजिक संघटना
व्यापारी असोसिएशन, यांची व्यापक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे सदर मीटिंग बाबत मनपाचे कर निर्धारण अधिकारी यांनासुद्धा आपण निमंत्रित करणार आहोत तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येते आहे.
पद्माकर जगदाळे सतीश साखळकर पप्पू मजलेकर उमेश देशमुख हनमंतराव पवार शंभूराज काटकर रुपेश मोकाशी विकास मगदूम मयूर बांगर अजित सूर्यवंशी
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा