शंभर दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प आज केला

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 02/01/2025 10:10 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

मुंबई दि:राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ना जयकुमार गोरे यानि मंत्रालयात मंत्री पदाचा पदभार घेतला
ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार...
आजमंत्री मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार घेतला.
येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प आज केला.
ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचावणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून काम चालू करणार आहे.
शिवाय पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दीदी कार्यक्रम १०० दिवसात करण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल दादा कुल, आमदार सचिन कांबळे-पाटील,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, श्री. अरुण गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या