नांदेड :- महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी या टॅबचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा. तसेच जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी टॅबमार्फत प्रशिक्षण घ्यावे. यासाठी महाज्योती मार्फत सिमकार्डही उपलब्ध करुन दिले आहेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले.
इयत्ता 11 वी मध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटीची तयारी करणारे विद्यार्थ्यानी ऑनलाईन महाज्योती यावेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा. त्यामध्ये इयत्ता १० वीचे गुणपत्रक व इ. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत, ज्यास्तीत जास्त विद्यार्थी टॅबसाठी पात्र ठरतील असे आवाहन त्यांनी केले.
इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यानी टॅबचा सदुपयोग चांगल्या प्रकारे घेऊन त्याद्वारे घेण्यात येणारे प्रशिक्षणाचा फायदा घेऊन वैद्यकीय/अभियांत्रिकी प्रवेशासाठी समाज घटकातील विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील अशी सदिच्छा व्यक्त केली.
विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्ग याघटकातील विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगामध्ये टिकूण राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ताधारण करणे, विद्यार्थी / विद्यार्थीनिना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकद्ष्टया उन्नती होणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले. टॅब वितरण प्रसंगी, विद्यार्थी, पालक कार्यालयातील कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.