देवळाली मतदार संघात युतीत बिघाडी की मैत्रीपूर्ण लढत
भाजपची भूमिका निर्णायक ठरणार?
देवळाली मतदार संघतुन युतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी शक्ती पदर्शन करत राष्ट्रवादी कॉग्रेस (AP) गटा कडून सोमवारच्या मुहूर्त दि २८रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व महाविकास आघाडी कडून मंगळवार दि २९ मोठं शक्ती पदर्शन करत आघाडीच्या नेत्यांन सोबत शिवसेना UBT गटाकडून योगेश ( बापू ) घोलप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यमुळं महायुती विरुद्ध महा आघाडी सरळ सरळ दुरगी लढत होणार असल्याच जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या माझी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी आपल्या उमेदवारीला शेवटच्या क्षणी शिवसेना ( शिंदे) सेनेचा एबी फ़ार्म जोडल्याने देवळाली मतदार संघात एकच खळबळ उडल्याने त्यामुळे देवळालीचे राजकारण तापले असून हे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होईल.
तरी देवळालीच्या मतदारंमध्ये मोठं संमभ्रम निर्माण झाला असून भाजपची निर्णायक मते कोणाला तारू शकतात हेही तितकेच महत्वाचे असून शिंदे सेना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय सुकर करण्याचा डाव तर नाही ना अशीही शक्यता वर्तवली जात असून सध्या जनसामान्यात चर्चेचा फोडणी मिळत आहे