नांदेड :- संविधान दिन आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन शक्ती सेना महाराष्ट्र, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि फकीरा विद्रोही विचारमंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजप्रबोधनपर व्याख्यान व राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २८ शुक्रवारी हॉटेल गणराज, नमस्कार चौक, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिंतनशील अभ्यासक प्रा.केशव शेकापूरकर तर कार्यक्रमाचे उद्धघाटन उमरखेड मतदार संघाचे माजी आमदार नामदेवराव ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुशीलप्रकाश चिमोरे यांनी समाजप्रबोधनपर विचार मांडले. तसेच अडवोकेट प्रसाद रानवळकर, माजी सनदी अधिकारी व्ही. जे. वरवंटकर, डॉ. रामचंद्र भरांडे, मारुती वाडेकर,प्रकाश कांबळे, अनिल वाघमारे,सर्जेराव दादा पाटील ढगे, प्रमुख वक्ते डॉ.चिमुरे,नगरसेविका सौ. ललिता रवींद्र भालेराव,केशव मालेगावकर,माजी सभापती नरेंद्र कंधारे,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व विविध क्षेत्रात लढनाऱ्या हाताचा हा सन्मान व गुणगौरव आहे, ह्या शब्दात कार्यक्रमाचे आयोजक विजय रणखांब यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवराप्रती आपली भावना व्यक्त केली. संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता, बंधुता आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार यावर यावेळी विचारमंथन करून संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी दै. साहित्य सम्राट वर्तमान पत्राचे दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रतिनिधी नागोराव कुडके यांची उपस्तिती मध्ये मान्यवराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,ल.सा.क.म. चे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब,नरेंद्र खंदारे, रत्नाकर शिंदे,पंडित तेलंग,गुणवंत मिसळवाड,रामदास पेंडकर, चंद्रकांत भांडवले, बाळासाहेब लोंढे,आकाश टोमके,शंकर रणखांबे,प्रशांत भिसे,दादाराव गुंडाळे,रवी रणखांब,सुनील कांबळे, बळीराम रणखांबे,बालाजी सकरगे,शिवकुमार मठवाले, प्रसिद्धी प्रमुख किशोरकुमार वागदरीकर आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत भांडवले यांनी केले.