नांदेड :- अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथे आज भारतीय जनता युवा मोर्चाने वनराई बंधारा उभारला. या बंधाऱ्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी श्रमदान केले.
लोकसहभाग व श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यासाठी आमदार श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून 'श्रमशंकर अभियान: एक दिवस पाण्यासाठी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सावरगाव येथे हा बंधारा उभारण्यात आला. "शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते," असे सांगून त्यांनी पुढील काळात भोकर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत लोकसहभाग व श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन यावेळी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंधाऱ्याच्या उभारणीचा शुभारंभ झाला. भोकर विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यातून संपूर्ण राज्यातील युवक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, असे प्रशंसोद्गार त्यांनी उद्घाटनीय कार्यक्रमात काढले. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही बंधाऱ्याच्या कामाला भेट देऊन उपक्रमाचे व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. आ. अमरनाथ राजूरकर यांनीही याप्रसंगी श्रमदान केले.
बंधारा उभारणीच्या शुभारंभ कार्यक्रमाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र युवती प्रमुख शांभवी साले, भाजपचे नेते गोविंदराव पाटील शिंदे, किशोर स्वामी, बी. आर. कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, नगराध्यक्षा सौ. वैशालीताई देशमुख, भोकरचे तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, शहराध्यक्ष विशाल माने, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, मुदखेडचे तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, माधव कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणकर, तालुकाध्यक्ष पवन इंगोले, केशव मुंगल, वेणू कोंडलवार, शहराध्यक्ष तुकाराम माटे, राम आबादार, अमित ऱ्याकावार, तसेच भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुराज रणखंब यांनी केले.