नाहाटा* *महाविद्यालयात* *पालक* *शिक्षक* *संघाची 25 वी सभा संपन्न अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे तर उपाध्यक्षपदी सौ रजनीताई संजय सावकारे*

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 30/08/2025 11:18 PM

भुसावळ
     भुसावळ कला,विज्ञान व पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ(कनिष्ठ महाविद्यालय)मध्ये 29/8/2025 शुक्रवार रोजी 2025 - 26 साठी पालक  शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.सभेत इ.11वी व इ.12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला.कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपाध्यक्ष पदी सौ.रजनीताई संजय सावकारे व सचिव पदी प्रा. सौ.ज्योती संजीव पाटील यांची निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक,चेअरमन श्री महेश फालक,सचिव श्री विष्णुभाऊ चौधरी व कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा यांनीगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तसेच उपप्राचार्य वाय. एम. पाटील सरांनी प्रास्ताविक सादर केले.अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.बी. एच.बर्हाटे यांनी केले,तर सूत्रसंचालन अर्चना सपकाळे व ज्योती पाटील यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन किर्ती नागदेव यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील, समिती सदस्य आर.पी. मसाने, जे.डी.येवले,एल.पी.टाक,टी.एम.पाटील, पी.व्ही.पाटील यांनी सहकार्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या