मैसूर दरभंगा व दरभंगा - मैसूर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/08/2025 11:43 AM



*मैसूर-दरभंगा एक्सप्रेस व दरभंगा-मैसूर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर*

*सांगली जिल्ह्यातून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार जाणाऱ्या प्रवाशांची सोय*

*सांगली जिल्ह्यातून नालंदा, राजगिरी, शिखर्जी, प्रयागराज, पचमढी, अयोध्या तीर्थस्थळांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी सोयीस्कर*

सांगली जिल्हा जागृती मंच केलेल्या मागणी अनुसार मैसूर-दरभंगा एक्सप्रेस गाडी 06211 ला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

*सांगली ते दरभंगा प्रवास* 
गाडी 06211 मैसूर-दरभंगा एक्सप्रेस
*प्रत्येक बुधवारी दुपारी 1:20 वा*
*सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटेल*

सांगलीतून सुटून पुणे, दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया(पचमढी), नरसिंगपूर, मदनमहाल(जबलपूर), कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज,  मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन (मुगलसरे), बक्सर, आरा, दानापूर, पटना, बखतीयारपूर(नालंदा, राजगिरी), मोखाम्मा, भरवणे, समस्तीपुर येथे थांबून 
दरभंगा येथे शनिवारी सकाळी 10 वाजता पोहोचेल.

*दरभंगा ते सांगली परतीचा प्रवास*
गाडी  06212 दरभंगा-म्हैसूर एक्सप्रेस
दरभंगा येथून प्रत्येक शनिवारी दुपारी 3:45 वाजता सुटेल.

दरभंगा येथून सुटून समस्तीपुर भरूनी लोकांना भक्तियारपूर, पटना, दानापूर, आरा, बक्सर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, मिर्जापुर, प्रयाग्रज चीयोकी, माणिकपूर, सतना, मेहर, कटनी, मदनमहाल(जबलपूर), नरसिंगपूर, पिपरीया(पचमढी),  इटारसी, भुसावल, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे येथे थांबून 
सोमवारी सकाळी 8 वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर पोहोचेल.
.
या रेल्वे गाडीचे तिकीट काढताना येताना व जाताना दोन्ही वेळा तिकीटावर सांगली रेल्वे स्टेशन नमूद करावा बोर्डिंग स्टेशन सांगली रेल्वे स्टेशन टाका.

Share

Other News

ताज्या बातम्या