भगवानदास केंगार यांना जीवनगौरव आदर्श पुरस्कार जाहीर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/08/2025 8:38 PM

   *ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 या पुरस्काराने आदर्श सरपंच म्हणून भगवानदास केंगार यांना सन्मानित करण्यात आले..*
शेड्याळ तालुका जत येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल व गेल्या २०-२५ वर्षापासून असलेल्या सामाजिक कार्य  व शेड्याळ गावातील गेल्या ५ वर्षांमधील केलेल्या उल्लेखनीय विकास कामे गावात म्हैशाळ योजनेच्या पाण्यासाठी केलेला आंदोलन.. गावातील शिक्षण व्यवस्था. गावातील अनेक वाडी वस्ती रस्ते.गावात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम ची व्यवस्था यासह अनेक विकास कामे गावात केलेली आहेत. यासह तालुक्यातील जिल्ह्यातील कोणत्याही सामाजिक विषयावर परखडपणे आपली भूमिका मांडत असतात व त्यासाठी पाठपुरावा करत असतात त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल गेल्या 25 वर्षापासून त्यांची सामाजिक चळवळ व या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 या वर्षीचा आदर्श सरपंच म्हणून भगवानदास केंगार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे..
हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम सांगली येथील हरिप्रिया सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला..
या कार्यक्रमाला खासदार विशाल दादा पाटील. आमदार इद्रीसभाई नायकवडी.माजी आमदार विक्रम दादा सावंत.मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुजय नाना शिंदे.समाज प्रबोधनकार व्याख्याते स्वाती कोकरे. सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे माजी नगरसेवक विष्णू माने.डॉ गुरु बगली. यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला व या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी ए डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गोरड. कार्याध्यक्ष महादेव महानुर. व यांच्यासह ए डी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पुरस्कारासाठी अनेक सामाजिक व राजकीय शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मान्यवरांना व कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते..
हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला..

Share

Other News

ताज्या बातम्या