ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेकडून सत्कार..आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण : अमोल पाटील, शिवसेना सोशल मिडीया प्रमुख

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/08/2025 11:45 AM

"आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान अनुभवला… 

जिथे मी विद्यार्थी म्हणून अक्षर ओळखले, स्वप्नांना पंख मिळाले, तिथेच आज माझ्या सामाजिक कार्याची आणि जबाबदाऱ्यांची दखल घेतली गेली. जिथे घंटा वाजली की आधी खेळायला पळायची उत्सुकता असायची,जिथे शिक्षकांना घाबरून दुरूनच पळून जायचो...तिथं आज कौतुकाची पाठीवर थाप मिळवली.
 आजच कारण होत, शिवसेना सांगली लोकसभा सोशल मिडिया प्रमुख म्हणून नियुक्ती होण्याचा.

हा क्षण माझ्यासाठी शब्दांत मावणार नाही असा अभिमानाचा आहे. 🙏
हा सन्मान केवळ माझा नाही – माझ्या गुरुजनांचा, कुटुंबाचा, मित्रांचा आणि समाजाचा आहे.

माझ्या शाळेचे संस्कार, समाजाचे पाठबळ आणि योग्य व्यक्तीची साथ हेच माझ्या प्रवासाची खरी ताकद आहे. 🌿

आजच्या या गौरवाने मला नक्कीच आणखी प्रेरणा मिळाली आहे, समाजासाठी अजून मनापासून, निष्ठेने आणि समर्पणाने काम करण्याची. 

मनःपूर्वक आभार माझ्या शाळेचे, शिक्षकांचे आणि सर्व शुभेच्छुकांचे

Share

Other News

ताज्या बातम्या