कुपवाड येथील अकुज इंग्लिश स्कूल व उपाध्ये गर्ल्स हायस्कूल येथील कराटे प्रशिक्षणास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/08/2025 12:48 PM

     आज दि. 23.08.2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली व जिल्हा परिषद, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान व कन्या सबलीकरण योजने अंतर्गत अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड व अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेतील विद्यार्थीनींचे कराटे प्रात्यक्षिक वर्गास भेट देणेसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलिस प्रमुख संदिप घुगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, शिक्षणाधिकारी माध्य. राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी प्राथ. मोहन गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे, वेतन पथक अधिक्षक रियाज शेख, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संचालिका व मुख्याध्यापिका  कांचन उपाध्ये, डॉ. पुनम उपाध्ये इ. मान्यवर उपस्थित होते. 
              सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी नशामुक्ती प्रतिज्ञा घेतली. न्यू प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी प्रसाद धोतरे याने व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक गीत सादर केले. न्यु प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांचे प्रबोधन करणेत आले. यावेळी या कार्यक्रमाचा मुख्य हेतू कन्या सबलीकरण योजने अंतर्गत विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण वर्गास भेट देणेत आली. यावेळी विद्यार्थिनींनी लाठी-काठी, कराटे, बॉक्सिंग इ. नेत्रदिपक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच नशामुक्ती अभियाना अतंर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व निबंध लेखन प्रदर्शनास भेट देवून कौतूक केले. 
              पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. व्यसनमुक्तीचे काम हि संस्था अनेक वर्षे करत असल्याबद्दल विशेष कौतुक केले. लाठी काठीचे 5000 मुलीचे एक विशेष पथक मुलींना आत्मनिर्भर करणेसाठी सांगली जिल्हामध्ये लवकर तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे यांनी केले तर आभार अनिल चौगुले यानी तर सुत्रसंचालन सुचिता पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षकेतर व पालक, गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या