*कै. खासदार गो.ह .देशपांडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत*ति.झं विद्यामंदिर, प्रथम क्रमांकाची फिरती ढाल मिळवून जिल्ह्यात प्रथम.*..
नाशिक एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी खा.कै.गो.ह.देशपांडे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते.या यावर्षी या स्पर्धेत इ.8वी ते इ.10वी या गटात शाळेतील इ.10वी ची विद्यार्थिनी कु. जानवी मिलिंद हिरे हिने प्रथम क्रमांक मिळवला.व इ.५वी ते ७ वी च्या गटातील विद्यार्थिनी कु. संस्कृती दिगंबर माळी हिने तृतीय क्रमांक चे बक्षीस तसेच कु.स्नेहल दिगंबर माळी या तृतीय क्रमांक पटकावला.विद्यार्थिनीने सहभाग नोंदविला. तसेच शाळेला सहभागाची ग्रामीण विभागातून *मानाची फिरती ढाल* प्रदान करण्यात आली .या सर्व विद्यार्थिनीचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, अडव्होकेट जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम शाळा समिती अध्यक्ष विश्वास बोडके सदस्य, मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते शिवाजी सोनवणे लक्ष्मण जाधव, कैलास दळवी अरुण चव्हाण, सौ मृदला शुक्ल, अंबादास आडके, दीपक बलकवडे, रत्नाकर बकरे चेतक बलकवडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष रूपाली उचाडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदन आडके यांनी कौतुक केले.
शिवाजी सोनवणे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून यशस्वी विद्यार्थिनींना रोख रकमेचे बक्षीस दिले
विजेत्या स्पर्धकांना हेमंत काशीकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी कुंदन गवळी, मराठी विभाग प्रमुख संदीप पाटील, माया सिसोदे कैलास टोपले यांनी प्रयत्न केले.