कुपवाड ड्रेनेज योजनेच्या बाबत विविध तक्रारी बाबत मा आयुक्त सत्यम गांधी साहेबांच्या दालनात मीटिंग संपन्न झाली.
शनिवार रविवार आमच्या नागरिक जागृती मंच कडे कुपवाड ड्रेनेज योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने येणारा गणपती उत्सव आयुक्त व जिल्हाधिकारी बंगल्याच्या गेटवर तसेच कुपवाड ड्रेनेज योजनेच्या चरी च्या ठिकाणी साजरा करण्यात येणार असे आंदोलन जाहीर करण्यात आले होते
त्याची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी काल रविवार मनपा कार्यकारी अधिकारी श्री कुरणे साहेब महाराष्ट जीवन प्राधिकरण अधिकारी श्री चौगुले यांना जागेवर जाऊन पाहणी करण्यास सांगितले होते.
त्याचा रिपोर्ट घेऊन आज आयुक्त दालनात
सतीश साखळकर,माजी नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार . रुपेश मोकाशी,आनंद देसाई व ड्रेनेज कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थिती मध्ये मीटिंग झाली.
ड्रेनेज योजनेचे काम चेंबर निकृष्ट दर्जाचे तसेच अंदाजपत्रक प्रमाणे करण्यात येत नाही
एच टी पी प्लांट,पंपिंग स्टेशन ची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.
चरी नियमानुसार. व अंदाजपत्रकानुसार मुजवल्या जात नसून किंवा त्यावर व्हायब्रेटर रोलर अथवा व्हायब्रेटर न करता कामे केली जात आहे
याबाबत आयुक्त साहेबांनी पाईपलाईनच्या कामाबरोबरच एसटीपी प्लांट पंपिंग स्टेशन याची सुद्धा कामे पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे आदेश दिले
तसेच ड्रेनेज योजनेचे चेंबर निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्याबाबत थर्ड पार्टी करणारा वालचंद कॉलेजच्या प्राध्यापक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी दहा दिवसाच्या आत समक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
निकृष्ट दर्जाचे चुकीचे काम होत असल्यास कोणालाही पाठीशी मी घालणार नाही आणि तुम्हीही घालायचा प्रयत्न करू नका असे आदेश दिले.
तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे सदर काम आहे या 240 कोटीच्या कामासाठी फक्त एकच शाखा अभियंता उपलब्ध असलेले आम्ही मा.साहेबांच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर तात्काळ चार शाखा अभियंता यांच्या देखरेखीखाली सदर ड्रेनेज चे काम पूर्ण झाले पाहिजे असे आदेश दिले.
तसेच ड्रेनेज पाईपलाईन टाकताना त्याखाली मुरूम व खडीकरण करणे अंदाजपत्रकात नमूद असताना त्या पद्धतीने काम केलेले पुरावे श्री रुपेश मोकाशी यांनी सादर केले त्यावेळी आयुक्त साहेबांनी ताबडतोब अशी कामे शोधून परत नियमाप्रमाणे व अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले.
तसेच ड्रेनेजच्या चरीची बिले पूर्ण अंदाज पत्रकारांना न भरता इतर मनपा फंडातून तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार फंड खासदार फंड यातून त्या ठिकाणची कामे मंजूर आहे त्यांच्याकडे कामे करून घ्यायची मात्र बिले दोन्हीकडून घ्यायची याची तक्रार आम्ही आयुक्त साहेबांकडे केली आयुक्त साहेबांनी प्रत्येक रोड निहाय ज्या ठिकाणी दोन ठिकाणी बिल उचललेले आहे त्याची माहिती आम्हाला व प्रशासनाला सादर करण्यास सांगितले आहे त्यावर जरूर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वस्त केले आहे
तोंडावर गणपती उत्सव असल्यामुळे नागरिकांना सणवार साजरे करताना चिखलातून व खड्ड्यातून जायला लागत आहे याबाबत ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या चरी बुजवायच्या राहिलेल्या आहेत त्या तात्काळ नियमाप्रमाणे मोजण्याचे आदेश त्यांनी दिले
आयुक्त साहेबांनी तात्काळ दखल घेऊन मिटिंग आयोजित केली व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मनपा ड्रेनेज विभाग व ड्रेनेज कॉन्टॅक्टर यांना काम करण्याचे आदेश दिले तसेच जागेवर काही ठिकाणी काम चालू झालेले आहे म्हणून आम्ही गणपती उत्सव साजरा करण्याचे आयुक्तांच्या घरासमोरचे व कलेक्टर ऑफिसचे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत
आज अखेर ड्रेनेज ठेकेदाराला 90 कोटी रुपये बीले अदा केलेले आहेत तसेच 50 कोटी रुपयांची बिले शासन अनुदान प्राप्त झाले नसले मुळे मनपाकडे थकीत आहेत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार तत्कालीन आयुक्त श्री गुप्ता यांनी संपूर्ण पाईपलाईनचे बिल आडवांस मध्ये दिलेले आहे असे कळते याची माहिती आम्ही घेत असून लवकरच याबाबत आपणास आम्ही माहिती आधारे बोलू....
सतिश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली.