आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी: गणेशोत्सव काळात
सर्वांनी कायदा पाळणे गरजेचे असून कायदा पाळला नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा स्पष्ट सूचना दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिल्या.
दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव, माजी सभापती अतुल जाधव, सरपंच दादासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मडके, शांतता कमिटीचे रावसाहेब देशमुख, महावितरणचे नीलेश कदम, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे, दहिवडी पोलीस ठाणे गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर, स्वराज करियर अॅकॅडमीचे सुनील काटकर यांच्यासह दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, विविध
मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व इतर गावांचे सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार आणि महिला पोलीस पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दराडे म्हणाले की, गणेशोत्सव काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्था कायम टिकून राहील याचे भान राखली पाहिजे. नियम सर्वांना माहीत असतात, त्याचे पालन सगळ्यांनी करायला पाहिजे. पर्यावरण पूरक व समाजाला योग्य दिशा देणारे उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी राबवावेत. वीज चोरी न करता रीतसर कनेक्शन घ्यावे. डीजे
डॉल्बीला परवानगी नाही. सर्वांनी फ्लेक्स लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आवश्यक आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही दराडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मडके, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, बिदाल गावचे इंगवले यांची भाषणे झाली.
संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळात प्रथम क्रमांक मिळालेल्या
नरवणे गावच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रवी तुपे आणि तोंडले गावच्या गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले.
गेल्या वर्षी गणेशोत्सव मंडळाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये उपक्रमशील आणि पारितोषिक मिळालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड यांनी केले, तर शांतता कमिटीचे सदस्य रावसाहेब देशमुख यांनी आभार मानले.