आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
फलटण:चौधरवाडी ता. फलटण येथील ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोशिएशन तर्फे सातारा (शाहू स्टेडियम )येथे झालेल्या वयक्तिक क्रीडा प्रकारात आपल्या गावची खेळाडू कु.कोमल महेंद्र खिलारे हिची १५००मीटर धावणे प्रकारात दुसरा क्रमांक पटकावून राज्याच्या संघात स्थान मिळवले व तिची बालेवाडी (पुणे )येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली तसेच कु. प्रतिक्षा महेंद्र खिलारे हिचा ४०० मीटर धावणे प्रकारात चौथा क्रमांक मिळाला ,तसेच कु.शिवानी विनोद चौधरी आणि कुमार ओंकार मोहन कानडे यांनी ही यश संपादन केले त्याबद्दल चौधरवाडी ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आले. या वेळी माजी सरपंच मनोहर गिरमे अण्णा, श्री ,अंकुश गिरमे ,श्रीराम कारखान्याचे संचालक श्री .उत्तमराव चौधरी,माजी उपसरपंच हेमंतराव भोसले,उपसरपंच श्री .रामदास भोसले, आनंदराव धायगुडे , तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते,सूत्रसंचालन श्री.मुकुंद धनवडे यांनी केले याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक मा .अविनाश साळवे सर यांनी क्रीडा स्पर्धेचा आढावा सांगितला आणि कार्यक्रमाचे आभार श्री .नंदकुमार बनसोडे यांनी मानले.