मराठा आरक्षण लढ्याला जयं हिंद सेनेचा जाहीर पाठिंबा, पक्षप्रमुख चंदनदाद चव्हाण यांनी आंदोलन स्थळी दिले पाठिंब्याचे पत्र

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/08/2025 8:17 PM

मुंबई प्रतिनिधी : मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला जय हिंद सेना महाराष्ट्र राज्याने अधिकृत पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जारांगे पाटील यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

यावेळी गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष रामदास सावंत, ओंकार जगताप, अक्षय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असून त्यांचे तात्काळ निराकरण करणे आवश्यक असल्याचे मत जय हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि कायदेशीर भक्कम आरक्षणाची हमी मिळाली पाहिजे. शिक्षण व नोकरीत तत्काळ लाभ द्यावा, शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतंत्र आरक्षणाची तरतूद व्हावी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज सवलती मिळाव्यात तसेच शेतकरी बांधवांना कर्जमाफी व अनुदानात प्राधान्य द्यावे, या मागण्या तातडीने मान्य कराव्यात.

"मनोजदादा जारांगे पाटील यांचा लढा हा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून मराठा समाजाच्या अस्तित्व, सन्मान आणि भविष्याशी संबंधित आहे. सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल," असा इशारा जय हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

जय हिंद सेनेचा मिळालेला हा पाठिंबा मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला नवी ताकद देणारा ठरणार आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या