आयुक्त सत्यम गांधी ॲक्शन मोडवर, सुट्टीदिवशी केली चैत्रबन नाल्याची पहाणी, लोकहित मंचने केले आयुक्तांचे कौतुक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/04/2025 8:30 PM

* *आयुक्त सत्यम गांधी ॲक्शन मोडवर- सुट्टी दिवशीही केली चैत्रबन नाल्याची पाहणी- लोकहित मंचच्या वतीने आयुक्तांचे अभिनंदन*                            

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी आपल्या कामाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज सुट्टीचा दिवस असतानाही चैत्रबन नाल्याच्या कामाची पाहणी केली.
   दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सदर चैत्रबन नाला पात्राबाहेर पडून नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे जीवन आणि आरोग्य धोक्यात आणतो. त्यामुळे सध्या सदर नाल्याचे 10 कोटी रुपये खर्चून आरसीसी बांधकाम चालू आहे. सदर कामाची आज आयुक्त सत्यम गांधी यांनी सुट्टीचा दिवस असतानाही भेट देत पाहणी करून अधिकाऱ्यांसह कॉन्ट्रॅक्टरला पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 
            . सुट्टीचा दिवस असतानाही लोकांच्या आग्रहाखातर फिल्डवर उतरून सदर ठिकाणी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतल्याबद्दल  लोकहित मंचच्या  वतीने त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. 
     अशाच तऱ्हेने लोकाभिमुख काम करत राहिल्यास लोक नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत.....
    यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने, ज्यांनी या नाल्या संदर्भात पाठपुरावा केला ते रोज एक विषयाचे जनक सचिनभाऊ कदम, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शाखा अभियंता महेश मदने, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक  अनिल पाटील आदि उपस्थित होते 
 *मनोज भिसे - अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या