कुपवाड :- प्रतिनिधी
कुपवाड शहरातील गावभागातील श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरातील अंतर्गत भागाचे कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. जैन धर्मियांचे गावातील सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे मंदिर पाडून तिथे नवीन मंदिर बांधून मंदिर जीर्णोद्धार व पंचकल्याण पूजा कुपवाड शहरात होत आहे यासाठी पंचकल्याण कमिटी व जैन बांधवांकडून सदर मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करणेसाठी कुपवाड मधील जैन समाज बांधव व पंच कमिटी यांनी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्याकडे केली मगदूम यांच्या प्रयत्नातून कॉंक्रिटीकरण करून देतो असे सांगितले व आज त्या कामाचे उद्घाटन झाल्यामुळे जैन समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
यावेळी नेमगोंडा पाटील , अभय पाटील मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, कॅप्टन भालचंद्र पाटील, बाळू बोरगावे,महेंद्र पाटील,विजय खोत,सागर खोत, अनिल पाटील, नितीन लोकपुरे, देशभूषण कर्णाळे, चेतन आवटी, संदीप पाटील (भोसेकर),शुभम पाडळे यांच्यासह श्री भगवान आदिनाथ युवा मंच, पंचकल्याण प्रतिष्ठा महा महोत्सव पूजा समिती, सुधर्म सागर प्रतिष्ठान, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्यासह भागातील नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.