आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी दि:गोंदवले बुद्रुक ता. माण येथील नवचेतन्य हायस्कूल पाठीमागचा डाक बंगला रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे. ठेकेदाराच्या मनमानीमुळे या रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होत उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचबरोबर कार्यकारी अभियंता यांना या रस्त्याच्या कामाची तपासणी होण्याबाबत सह्यानिशी पत्र दिले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, सदर रस्त्यावरील खडी मुरमाचा थर पूर्णपणे उघडा पडलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली साईडपट्टी मुरमाऐवजी तिथल्याच शेतातील काळया मातीने भरली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असणारी तर ही काही ठिकाणी काढण्यात आलेली नाही. तरी या कामाची संबंधित अधिकारी यांनी तपासणी करून कामाची गुणवत्ता तपासावी. तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरू आहे का नाही याची शहानिशा देखील करावी.
ठेकेदार असं वारंवार सूचना देऊन देखील त्याने चुकीच्या पद्धतीने उडवा उडीद उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. याचा या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला मनस्ताप झाला आहे. या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून चांगल्या दर्जाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे. अशी विनंती देखील संबंधितांनी पत्रात केली आहे.
त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून रस्त्याच्या जागा धारकांना तपासणी करून सूचना द्याव्यात, असे देखील दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
फोटो ओळी : डाग बंगल्यापासून जाणाऱ्या रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम